शहाजीराजे भोसले

मालोजीराजांची पुणे व सुपे परगण्याची जहागिरी त्यांच्या मृत्यू नंतर वयाच्या पाचव्या वर्षी शहाजी राजांना मिळाली व आपले काका विठोजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कारकीर्द फुलू लागली. पुढील काळामध्ये पराक्रमी शहाजीराजांनी निजामशाही किंवा आदिलशाहीमध्ये स्वकर्तुत्वावर जहागिरी मिळवली व टिकवली होती सुपे परगण्याची जहागिरी बहुतांश काळ त्यांचेकडेच असल्याने क-हेपठारावर त्यांचा नेहमीच वावर होता. जिजाऊ मासाहेब व शिवराय यांचेकडे पुणे प्रांतातील कारभार सोपविल्यानंतर त्यंचा मुक्काम अखेर पर्यंत बंगरूळलाच होता.'
चिटणीसाची बखर' मधील वर्णनानुसार शिवाजी महाराजांची व शहाजी राजांची ऐतिहासिक भेट जेजुरगडावर झाली होती. याभेटीचे वर्णन करताना बखरकार म्हणतो ही भेट ब-याच कालावधीनंतर होत असल्याने प्रत्यक्ष समोरासमोर उरभेट होण्यापूर्वी कास्याच्या परातीमधील तुपामध्ये मुखदर्शन घेऊन मगच प्रत्यक्ष भेट घेतली. या ऐतिहासिक भेटीचे समूहशिल्प जेजुरगडावर नव्याने उभे रहात आहे.